"लळिताचे साळुंब्रे"
पुणे ही खरी पुण्यनगरी! देहू आळंदी सारख्या पवित्र तीर्थांची धरणी! याच देहूपासून ३ मैलांवर सध्याच्या शिरगांवाच्या शेजारीच (प्रतिशिर्डी) वसलेले साळुंब्रे हे एक छोटेसे टुमदार गांव! या गावच्या कुलकर्ण्यांचे घराणे मोठे धार्मिक! गावात मोठा चौसोपी वाडा! वाड्याच्या दिंडी दरवाजातून एक बैलगाडी आत जाई इतका मोठा!
याच वाड्यात सुमारे ३५० वर्षांपूर्वी श्रीधरबुवा रामदासी नामक एक समर्थ शिष्य रामदासी बुवा भिक्षा मागण्यासाठी म्हणून आले.घरातील धार्मिक वातावरण पाहून प्रसन्न होऊन त्यांनी आपल्या झोळीतील श्रीरामाच्या मूर्ती (श्रीराम पंचायतन ) कुबडी व झोळी कुलकर्ण्यांना देऊन रामनवमी चा महोत्सव दरवर्षी मोठ्या प्रमाणावर करण्याची दीक्षा दिली.झाले! दर वर्षी हा रामनवमीचा उत्सव अगदी मोठ्या प्रमाणावर सुरु झाला! इतका की अखंड ९ दिवस उभ्या पंचक्रोशीत चूल पेटत नसे! चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढी पाडवा ते रामनवमीचा दुसरा दिवस अर्थात लळित होईपर्यंत ही लगबग चाले! कीर्तन-प्रवचन-भजन-भोजन सर्वांची नुसती रेलचेल असे! सर्वजण मोठ्या उत्साहाने या उत्सवात आपले घरचेच कार्य समजून सहभागी होत! या रामनवमीच्या परंपरेने कुलकर्ण्यांना एक नवी ओळख समाजात मिळवून दिली.
"जळिताचे साळुंब्रे"
होता होता १९११ साल उजाडले. त्याकाळातील कुलकर्ण्यांच्या तरूण पिढीने आपणहून पुढाकार घेऊन हा उत्सव आयोजित करण्याचे ठरविले.इंग्रजांच्या शिक्षणाचा प्रभाव पडलेल्या या पिढीला उत्सवाचे जुने स्वरूप प्रतिगामी वाटू लागले. व यंदा भजन कीर्तनाऐवजी आपण उत्सवात नाटक ठेवू असा ठराव पास झाला!
घरातील जुन्या जाणत्या लोकांनी याला फ़ार तीव्र विरोध दर्शविला, कारण त्या काळी नाट्य कंपन्या या तमाशाचे फ़डकरीच चालवीत, तत्कालीन समाजात नाटक वगैरे गोष्टी या अनावश्यक, अहितकारी व त्याज्य मानल्या जात.परंतु नव्या पिढीने काही ऐकले नाही व नेटाने त्यांनी मुंबईच्या डान्स पार्टीला पाचारण करीत "राजा हरिश्चंद्र" या नाटकाचा प्रयोग रामनवमीच्या उत्सवात ठेवला.
झाले! ही बातमी वणव्यासारखी आजुबाजुच्या खेड्यापाड्यात पोहोचली! आणि ऐन नाटकाच्या रात्री ही गर्दी जमली! वाड्याच्या मध्यभागी प्रशस्त चौक होता, त्यातच खाली धान्याची पोती व वर फ़ळ्या टाकून तात्पुरते व्यासपीठ उभे केले गेले. ही अजून एक चूक झाली! अन्नावर नाटक? असो. गर्दीचा रेटा इतका वाढला की आत मुंगीलाही शिरायला जागा उरली नाही. कुलकर्ण्यांच्याच घराण्यातला लहानगा आत्माराम तेंव्हा जेमतेम ७ वर्षांचा होता. तो या गर्दीमुळे आतच शिरू शकला नाही व वाड्याबाहेरच अडकला!
नाटक सुरु झाले! उजेडासाठी पेट्रोमॆक्सच्या (बत्त्या) दिव्यांची योजना करण्यात आली होती. त्यातला एक दिवा अचानक विझला.कुणीतरी तो गडबडीत पुन्हा पेटवायचा प्रयत्न केला...आणि.....एकच क्षण.....सर्वत्र शांतता पसरली....एक मोठा स्फ़ोट करीत दिवा भडकला...आणि हा हा म्हणता त्या व्यासपीठाने पेट घेतला!एकच आकांत उडाला! आग आग! पळा पळा! जो तो मुख्य दाराच्या दिशेने धावू लागला आणि त्या रेट्याने दरवाजा पक्का बंद झाला! त्यातच जनावरांसाठी काढून ठेवलेल्या चा-याच्या गंज्यांनी पेट घेतला...आणि त्यापुढे जो घडला तो काळाकुट्ट इतिहास उभ्या जगाचे हृदय पिळवटून गेला....त्या एकाच रात्री त्या एकाच घरात, एक रामरायाची मूर्ती सोडली तर उरलेल्या प्रत्येक जिवाचा अक्षरश: कोळसा झाला. सुमारे अडीच हजार लोक आत होते ते सर्वच्या सर्व यमसदनाला गेले! आकांत आकंत झाला! कारण आजुबाजुच्या १२-१५ गावातील एकाही घरात कुणीही कर्ते म्हणून शिल्लक राहिले नाही! एक नव्हे दोन नव्हे तीन तीन पिढ्या कायमच्या संपल्या!
तो आकांत प्रत्यक्ष पहाणारे सांगत की दुस-या दिवशी त्या वाड्यात सोन्याचे किलोकिलोचे गोळे इतस्तत: विखुरलेले दिसत होते! अर्धवट जळलेल्या प्रेतांचा इतका खच पडला होता की तो सर्व परिसरच अनेक दिवस एक ज्वलंत स्मशान बनून राहिला...कुणाचे कोण काही कळेना...सर्व प्रेतांना एकत्र ढीग करून भडाग्नी देण्याचे काम पुढे कित्येक दिवस चालले होते!
जागृत परंपरेला छेद देण्याचे पातक सर्व कुलकर्णी कुटुंबियांनी भोगले. त्यांचा जणु निर्वंश झाला! एकटा आत्माराम मात्र य घटनेतून वाचला! त्याने ते गाव जे सोडले ते कायमचेच!
या घटनेचे गांभिर्य इतके होते की तत्कालीन जगातील सर्व देशांतील प्रमुख वर्तमान पत्रांनी या घटनेचा सविस्तर वृत्तांत प्रकाशित केला! केसरीमध्ये तर पानेच्या पाने भरून या अग्नि प्रलयाचे वर्णन छापले गेले.
पुढे काही वर्षांतच या मूळ राममूर्तीही चोरीला गेल्या. तरीही अत्यंत दारिद्र्याचे चटके सोशीत आत्मारामपंतांनी रामाच्या एका अतिसुंदर छायाचित्रासमोर उत्सव सुरु ठेवला.त्यांचेनंतर त्यांचे पुत्र श्रीकृष्ण यांनी या परंपरेचे पुनरुज्जीवन करण्याचे मनोमन निश्चित केले. आपला नोकरी व्यवसाय सांभाळतच त्यांनी पुण्यातील न-हे गावात एक छोटासा जमिनीचा तुकडा खरेदी केला. व तेथे स्वखर्चाने अतीशय सुंदर असे राममंदिर बांधले! त्यांच्या धर्मपत्नी सौ. जयश्री यांनीही त्यांना तन-मन-धनाने साथ देत या मंदिराची उभारणी केली!
सध्या दोघेही निवृत्त आहेत. एकाची पेन्शन घर चालवायला व दुसरी पेन्शन रामनवमीच्या उत्सवाला! असे गेले अनेक वर्षे ते उत्सव अव्याहतपणे करीत आहेत!रामाच्या मूर्ती जयपूरहून आणलेल्या असून अतीशय सुंदर आहेत! पहाताक्षणी भौतिक जगाचा विसर पडावा असा हा पवित्र परिसर आहे!
अत्यंत अयाचित वृत्तीने, निस्पृहपणे व उत्कट भक्तीने उभे केले गेलेले हे श्रीराम मंदिर म्हणजे समर्थ दीक्षित परंपरेच्या अक्षय्यतेचा अभंगतेचा व अथांगतेचा एक भव्य दिव्य पुरावाच आहे!